Shri Sangameshwar Education Society's
Sangameshwar College, Solapur
(Autonomous)
(Affiliated with Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University)
Kannada Linguistic Minority Institute
NAAC Accredited with 'A' Grade (III Cycle CGPA 3.39)

शैक्षणिक वर्ष २०२०-२१

* पदव्युत्तर भाग 2 प्रवेशासंदर्भात महत्वाची सूचना *

 • पदव्युत्तर भाग 2 या वर्गाची प्रवेश प्रक्रिया गुरुवार दिनांक १० सप्टेंबर 2020 पासून सुरू होत असून विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश घ्यावा. प्रवेशाची कार्यपद्धती खालील प्रमाणे आहे.
 • 1. जे विद्यार्थी पदव्युत्तर भाग एक म्हणजेच एमए/ एमकॉम भाग १ मध्ये शिकत होते त्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.
 • 2. पदव्युत्तर द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी संगमेश्वर कॉलेजच्या www.sangameshwarcollege.ac.in या वेबसाईटवर जाऊन प्रवेश पावतीवर किंवा ओळखपत्रावर असलेला युनिक आयडी टाकून लॉग इन व्हावे. तदनंतर get user ID and password वर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरुवातीला रजिस्ट्रेशन करतेवेळी नमूद केलेल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर युजर आयडी व पासवर्ड येईल.
 • 3. प्राप्त झालेल्या यूजर आयडी व पासवर्ड नुसार लॉग इन होऊन ऑनलाइन रजिस्ट्रेशन फॉर्म पूर्णतः भरावा व त्याची प्रिंट काढून त्यासोबत ऑनलाइन रिझल्टची कॉपी जोडून प्रवेश समितीच्या सहीसाठी कॉलेजमध्ये यावे.

 • सूचना
 • 1. कॉलेजमध्ये प्रवेश करताना तोंडावर मास्क असणे अनिवार्य आहे.
 • 2. एकावेळी एकाच विद्यार्थ्याला प्रवेश देण्यात येईल.
 • 3. कॉलेज परिसरात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्याजवळ ऑनलाइन फॉर्म भरलेल्या फॉर्मची हार्ड कॉपी असणे आवश्यक आहे.
 • 4. हार्ड कॉपी सोबत खालील कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे.
  1. ऑनलाइन ऍडमिशन फॉर्म ची प्रिंट आउट
  2. ऑनलाईन रिझल्ट लेजर कॉपी.
 • वरील सर्व कागदपत्रासह प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित विभाग प्रमुखांशी संपर्क साधावा व विद्यार्थी आणि विभाग प्रमुख यांच्या सोयीनुसार ऑनलाइन फॉर्म ची हार्ड कॉपी संबंधित विभाग प्रमुखांकडे सादर करावी. प्रवेश अर्ज सादर केल्यानंतर आपणास त्यादिवशी किंवा दुसऱ्या दिवशी प्रवेशाचे शुल्क भरण्यासंबंधी एस एम एस येईल. एसएमएस आल्यानंतर आपण ऑनलाइन प्रवेशशुल्क भरावे. प्रवेशशुल्क भरताना शक्यतो युपीआय आयडीने भरावे जेणेकरून कोणतेही ज्यादा चार्जेस आपणास द्यावे लागणार नाहीत.
 • प्रवेशाचे शुल्क भरण्यासाठी आपण कॉलेजच्या फि पेअर ॲप मध्ये लॉग इन होऊन निश्चित केलेले शुल्क विहित मुदतीतच ऑनलाइन भरावे. प्रवेशशुल्क संदर्भाची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवेशाचे शुल्क ऑनलाईन भरणे संदर्भात वेबसाईटवर सविस्तर माहिती अपलोड केलेली आहे. प्रवेशशुल्क यशस्वी पणे भरल्यानंतरच प्रवेश निश्चित समजण्यात येईल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

Sangameshwar College, Solapur, Maharashtra

 165, Railway Lines,

 Saat Rasta, Solapur - 413001

 Post Box No. 52

 

 Email : prin_sangameshwar@yahoo.com

 Office Phone : +91-217-2315588, Fax : +91-217-2315588

 Principal Phone : +91-217-2316688

 Computer Science Dept :- +91-217-2315566

Follow Us On

Designed and Developed By Management and Computer Science Department, Sangameshwar College, Solapur
Updated On:17-Jan-2022
No. of Visitors: 699574