सर्व पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन !
सर्व एम.ए/एम.कॉम-भाग 1 साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी संगमेश्वर कॉलेजच्या संकेतस्थळावर www.sangameshwarcollege.ac.in जाऊन गुणवत्ता यादीसाठी रजिस्ट्रेशन लिंक वर क्लिक करून फॉर्म भरावा. सदरील ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे PDF format मध्ये तयार ठेवावीत. (साईज २०० केबी पेक्षा जास्त नसावी).
ऑनलाइन फॉर्म भरण्याचा दिनांक ०६-०८-२०२१ ते २3-८-२०२१.
आवश्यक कागदपत्रे
- पदवी भाग ३ ची गुणतक्ता 2 प्रति
- जात प्रमाणपत्र (मागास प्रवर्गासाठी)
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड
- विद्यार्थ्यांची स्वाक्षरी (jpg format)
Sr.No.
|
Process
|
Date
|
1.
|
ऑनलाईन नोंदणी
|
6 ऑगस्ट ते २3 ऑगस्ट २०२१
|
2.
|
पहिली गुणवत्ता यादी
|
२६ ऑगस्ट २०२१
|
3.
|
पहिल्या यादीतील प्रवेश
|
२६,२७ व २८ ऑगस्ट २०२१
|
4.
|
दुसरी गुणवत्ता यादी
|
३१ ऑगस्ट २०२१
|
5.
|
दुसऱ्या यादीतील प्रवेश
|
३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२१
|
6.
|
तिसरी गुणवत्ता यादी
|
४ सप्टेंबर २०२१ (जागा शिल्लक असल्यास)
|
7.
|
तिसऱ्या यादीतील प्रवेश
|
४ व ५ सप्टेंबर २०२१
|
महत्वाची सूचना
संगमेश्वर कॉलेज कन्नड भाषिक अल्पसंख्यांक कॉलेज असल्याने ज्या विद्यार्थ्यांची मातृभाषा कन्नड आहे अशा विद्यार्थ्यांसाठी पन्नास टक्के जागा राखीव आहेत. या आरक्षणाचा लाभ घेण्याकरिता ONLINE Registration करताना Minority (Kannada Minority) Option Select करणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर मातृभाषा कन्नड असल्याची नोंद असावी अथवा कन्नड मातृभाषा असल्याचे प्रतिज्ञापत्र विहित नमुन्यात सादर करणे संबंधित विद्यार्थ्यावर बंधनकारक आहे.
टीप
- कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे सर्व प्रक्रिया ऑनलाइन राबविण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर प्रवेशाचे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.
- ऑनलाइन प्रवेश शुल्क भरताना मागास प्रवर्ग/आर्थिकदृष्ट्या मागासलेले/ माजी सैनिक अशा विविध सवलती खाली ऑनलाइन प्रवेश शुल्क भरल्यास संबंधित सवलतीचा फॉर्म विहित मुदतीत विद्यार्थ्यांनी भरणे बंधनकारक आहे.
- अंतिम प्रवेशाच्या वेळी ऑनलाइन सादर केलेल्या सर्व कागदपत्राच्या प्रति व शाळा सोडल्याचा मूळ दाखला प्रवेश अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
- एम.ए इंग्लिश , एम.ए. हिंदी व एम.ए. मानासशास्त्र या विषयास दि. ११ ऑगस्ट २०२१ पासून थेट प्रवेश देण्यात येणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
- ज्या विद्यार्थ्यांना तृतीय वर्षाच्या विषया व्यतिरिक्त इतर विषयातून पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावयाचा असल्यास प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक आहे. प्रवेश परीक्षेच्या गुणवत्ते नुसार व पात्र झालेल्या विद्यार्थांना सदर विषयास प्रवेश देण्यात येईल.
प्रवेशाच्या अधिक माहितीसाठी संपर्क
एम.ए. भाग 1 इंग्रजी
|
प्रा. सौ. एन. व्ही.साठे (9422458744)
|
एम.ए. भाग 1 हिंदी
|
डॉ.एस.एम.दुद्डे ( 9766997174)
|
एम.ए. भाग 1 समाजशास्त्र
|
डॉ.एम.एस.धोकटे (9403295144)
|
एम.ए. भाग 1 मानसशास्त्र
|
डॉ.पी.एस.बनसोडे (9922333666)
|
एम.ए. भाग 1 राज्यशास्त्र
|
डॉ.आर.पी.बुवा (7588242511)
|
एम.कॉम. भाग 1
|
डॉ. वंदना पुरोहित (9822724011)
|
एम.एस्सी. भाग 1 कॉम्पुटर सायन्स
|
प्रा.कोडम नितिन (9860616459)
|
गुणवत्ता यादी व प्रत्यक्ष प्रवेश यासंदर्भात वेळोवेळी सूचना संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील याची विद्यार्थ्यानी नोंद घ्यावी.
- डॉ. शोभा राजमान्य, प्राचार्या